सावंतवाडी/प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त ०६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन डायमंड हॉल माजलगाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दैनिक तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांची विशेष उपस्थिती राहणार असून यावेळी तालुका पत्रकार संघाच्या आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राष्ट्रीय अध्यक्ष- मराठी पत्रकार परिषद गजानन नाईक, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष गणेश जेठे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत