70 वर्षांपर्यंत मुलांना मोफत शिकविण्याचे कार्य ः पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पद्मश्री नंद किशोर प्रुस्टी यांचे मंगळवारी निधन झाले आहे. एका खासगी रुग्णालयात वयाच्या 104 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लोकांदरम्यान ते नंदा सर या नावाने प्रसिद्ध होते. मागील महिन्यातच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह समवेत अन्य अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
ओडिशात शिक्षणाचा आनंद फैलावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे अत्यंत सन्मानित नंदा सर यांचे अनेक पिढय़ांकडून स्मरण केले जाणार आहे. काही आठवडय़ांपूर्वी पद्म पुरस्कार सोहळय़ात देशाचे लक्ष आणि प्रेम त्यांनी आकर्षित केले होते असे पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे.
ओडिशामध्ये मुलांना मोफत शिक्षण प्रदान करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी पुस्टी यांना अलिकडेच पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. या महान आत्म्यास त्याच्या निस्वार्थ सेवेसाठी देश नेहमीच स्मरणात ठेवणार असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले आहे.
v