कोकरूड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मायोजने अंतर्गत नोंदणीकृत बचत गट ज्योतिर्लिंग शेतकरी बचत गट, पणुंब्रे-वारूण यांचे संयुक्त विद्यमाने पणुंब्रे-वारूण (ता.शिराळा) येथे तांदूळ महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी हजेरी लावली होती.
या तांदूळ महोत्सव मध्ये भाताच्या नामशेष होत चाललेल्या औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध ११ जातींच्या वाणांचा तांदूळ महोत्सव भरवण्यात आला होता.या महोत्सवामध्ये नैसर्गिक मध, सेंद्रिय नाचणी व वरी विक्रीसाठी बचत गटामार्फत ठेवण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक कुंभार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषि संशोधन केंद्र ,कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व शिराळा तालुक्यातील सर्व मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि सहाय्यक, शेतकरी मित्र, प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते