कोतोलीतील ६ जणांचा समावेश, एकुण रुग्णसंख्या १३२ वर
पन्हाळा/प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा आलेख दिवसगणित वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.तालुक्यातील पश्चिम भागात विशेषत: कोतोली परिसर कोरोनाचे हॉट स्पॉट ठरत आहे. आज सकाळ पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोतोलीत आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांंच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.या सहा रुग्णांसह कोतोलीगावाची रुग्णसंख्या 32 वर पोहचली आहे.
तसेच कोतोली गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या माळवाडी येथे देखील कोरोना शिरकाव केला असुन आज तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाची धास्ती वाढली आहे. तर पडळ येथे दोघांचा अहवाल पाँझिटीव्ह आला .पोर्ले गावात गेल्या काही दिवसापासुन रुग्णसंख्येत झपाट्यात वाढ होती. त्यामुळे गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध उपाययोजनासह कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आहे. मात्र तरी देखील आज पोर्ले येथे एकाचा अहवालपॉझिटिव्ह आल्याने चिंता लागुन राहिली आहे.पन्हाळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या कोडोली गावात देखील आज 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कोडोली गावात योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा लोकसंख्या जास्त असल्याने गावात कोरोनाचा वाढता प्रसार आटोक्यात आणता ना सर्वांचीच दमछाक होणार यात शंका नाही.
एकुणच आज तालुक्यात दुपार पर्यंत 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकुण रुग्णसंख्या 132 वर पोहचली आहे. अजुन सायंकाळ पर्यंत किती रिपोर्ट येणार आहेत.याकडे संशियत रुग्णांच्यासह प्रशासनाचे डोळे लागले आहेत.