कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा बँकेची आज मतमोजणी पार पडली या संपूर्ण मतमोजणीत धक्कादायक निकाल म्हणजे सत्ताधारी गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचा नागरी बँक, पथसंस्था गटातून पराभूत झाले आहेत. या गटातून प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांचा विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. आमदार प्रकाश आबिटकर हे सत्ताधारी गटासोबत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
दरम्यान, शिवसेनेने बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि पत संस्था गटातून अर्जुन आबिटकर यांना उमेदवारी दिली. आज झालेल्या मतमोजणीत अर्जुन आबिटकर यांचा विजय झाल्याने सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत. अर्जुन आबिटकर यांचा विजय सत्ताधारी गटाला धक्का मानला जातो. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी ‘परफेक्ट नियोजन डायरेक्ट कार्यक्रम’ अशा पद्धतीचे स्टेटस व्हॉट्सअॅप आणि समाज माध्यमावर ठेवले आहेत. त्यामुळे परफेक्ट नियोजन करून कोणाचा कार्यक्रम करण्यात आला अशी चर्चा आता रंगू लागले आहे.