प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूच प्रसार रोखण्यासाठी परराज्यातील परिवहन सेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. मात्र परराज्यामधून येणाऱया नागरिकांचा ओढा सुरूच आहे. परराज्यामधून आतापर्यत 2739 नागरिक आले असून यापैकी सध्या 207 नागरिक सरकारी संस्थेत तर 600 हून अधिक नागरिक होम क्वारंटाईन आहेत. उर्वरीत नागरिक क्वारंटाईनमुक्त झाले आहेत.
शहरातील व्यवहार सुरळीत सुरू असले तरी रात्री नऊ नंतर लॉकडाऊन करण्यात येत आहे. पण कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबविण्यासह खबरदारी घेतली आहे. कर्नाटकात कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागरिकांची संख्या नियत्रंणात आहे. मात्र शेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परराज्यामधून येणाऱया नागरिकांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यशासनाकडून परवानगी घेवून येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत आणि होम क्वारंटाईन रहावे लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असून विशेषता मुंबई, पुणे अशा शहरामधील सरकारी रूग्णालयात कोरोना वॉर्ड पुर्णक्षमतेने भरले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूवरील उपचार मिळणे कठीण बनले आहे. परिस्थिती खुपच गंभीर बनल्याने नागरिक आपल्या मुळ गावी परतत आहेत. बेळगाव परिसरातील नागरिकांची संख्या महाराष्ट्रात भरपुर आहे. त्यामुळे बेळगावात परतणाऱयांचा ओढा वाढला आहे. महाराष्ट्रामधून दररोज शंभरहून अधिक नागरिक बेळगावात दाखल होत असून सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात येत आहे. आयसीएमआर नेंदणीकृत प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करून घेतल्यानंतर बेळगावात दाखल झालेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
आतापर्यत 2539 नागरिक परराज्यामधून परवानगी घेवून बेळगाव शहरात दाखल झाले आहेत. या सर्वांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी सध्या 207 नागरिक सरकारी संस्थेत क्वारंटाईन आहेत. तर 600 हून अधिक नागरिक होम क्वारंटाईन आहेत. उर्वरीत नागरिकांचा क्वॉरंटाईनचा अवधी पुर्ण झाल्याने तसेच त्यांचे आरोग्य व्यवस्थित असल्याने त्यांना क्वॉरंटाईन मुक्त करण्यात आले आहे. 207 नागरिकांना बारा ठिकाणी सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले असून यामध्ये 122 पुरूष, 74 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कातील 19 जणांना सध्या सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात एकूण 226 नागरिक सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.