प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अंजुमन इस्लाम या संस्थांकडून रुग्णसेवा करण्याचे काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही संघटनांनी एकमेकांच्या कार्याची पाहणी केली आणि ज्या ठिकाणी जी कमतरता आहे ती परस्पर समन्वयातून भरून काढू आणि रुग्ण सेवा करू असा निर्णय यावेळी घेतला.जात भेद, आणि राजकारण विसरून आपण या कोरोना महामारीत एकत्र येऊन काम करु आणि कोरोना पासून लवकर मुक्त होण्याचा निर्धार यावेळी दोन्ही संस्थांनी केला.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे म ए समिती आणि अंजुमन ए इस्लाम या संस्थेने कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारले आहे. त्यामुळे म ए युवा समितीच्या सदस्यांनी अंजुमन ए इस्लाम या संस्थेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरला सोमवार भेट दिली. आणि आणि रुग्णांची उत्तम प्रकारे सोय केल्यामुळे त्यांचे कौतुक करून आभार मानले
अंजुमन या संस्थेने अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच म ए समितीला सुद्धा या कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवून मदत दिली आहे.
अशा प्रकारची कोणतीही मदत हवी असल्यास परस्पर समन्वयातून एकमेकांना मदत करू असा असा निर्णय यावेळ दोन्ही संघटनांच्या वतीने घेण्यात आला.
याप्रसंगी अंजुमन ए इस्लाम चे अध्यक्ष राजू सेठ, सेपेटरी समिउल्ला, अश्पाक घोरी, अमान सेठ म ए युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,समिती नेते मदन बामणे,कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर,उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे,आकाश भेकने,सिद्धार्थ चौगुले,आशिष कोचेरी आदी उपस्थित होते.