अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांनी इशकजादे या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर नमस्ते लंडन या चित्रपटातही हे दोघे झळकले होते. लवकरच त्यांचा संदीप और पिंकी फरार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखतीमध्ये परिणीतीने सांगितले की, अर्जुन कपूर हा माझा आवडता सहकलाकार आहे. इशकजादे हा आमचा पहिला चित्रपट होता. याशिवाय मला मेरी प्यारी बिंदू या चित्रपटात आयुषमान खुराणासोबत काम करण्यासही मजा आली. आम्ही गाण्यांवर बऱयाच गप्पा मारल्या. हसी तो फसी या चित्रपटामुळे माझी आणि सिद्धार्थ मल्होत्राची खूप घट्ट मैत्री झाली असे परिणीती म्हणाली. परिणीतीचा लेडिज व्हर्सेस रिकी बहल हा पहिला चित्रपट असला तरी इशकजादे हा चित्रपट आधी रिलीज झाला होता. इशकजादे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझे कौतुक झाले. अनेक पुरस्कारांमध्ये मला नामांकन मिळाले. असे परिणीतीने सांगितले.
Previous Articleदेशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 54.13 टक्के
Next Article वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट गरजेची