बेंगळूर/प्रतिनिधी
के.एस.आर.टी.सी. च्या चिकमंगळूर विभागाने मुडिगेरे आगारातील पाच चालक-वाहकांना निलंबित केले आहे. दरम्यान राज्यात ७ एप्रिलपासून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे यामागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान निलंबित केलेल्या या कर्मचार्यांनी १३ एप्रिल रोजी मुडिगेरे येथे संपाची धमकी देत, वाहनचालकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे त्यांना निलंबित केले आहे.
मंगळवारी चिकमंगळूर विभागात १८० बसेस चालविण्यात आल्या. हसन विभागात २२० बसेस चालविण्यात आल्या. शिवमोगामध्ये एकूण २०५ बसेसच्या तुलनेत १२३ बसेस चालविण्यात आल्या.