मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
बंबरगा (ता. बेळगाव) येथील एक विद्यार्थिनी गेल्या पाच दिवसांपासून बेळगाव येथून बेपत्ता झाली आहे. परीक्षा देण्यासाठी म्हणून ती बेळगावला आली होती. परीक्षेला न जाताच ती बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
अंकिता राणबा कोले (वय 21, रा. बंबरगा) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता परीक्षेसाठी म्हणून तिच्या वडिलांनी तिला मराठा मंडळ कॉलेजच्या प्रवेशद्वारावर सोडले होते. त्यानंतर ती परीक्षेला गेली नाही. घरीही परतली नाही.
तिचे वडील राणबा यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 5.3 फूट उंची, गहू वर्ण, अंगाने सुदृढ असे तिचे वर्णन असून ती बीकॉम तृतीय वर्षात शिकते. तिने आपल्या अंगावर चॉकलेटी चुडीदार व काळी पॅन्ट परिधान केली होती. अंकिता कन्नड, मराठी, इंग्रजी भाषा बोलते. या तरुणीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405242 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.