लोकप्रतिनिधी-अधिकाऱयांचा सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव येथील शहर प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ अभियानाला चालना देण्यात आली. तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि बालकाला लस देऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मनपा आयुक्त जगदीश के. एच., डॉ. आय. पी. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, एसएमओ डॉ. सिद्धलिंगय्या, मनपा आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, एम. एस. रोट्टी, चंद्रशेखर सुखसारे, राममूर्ती, रो मनोज सुतार, अजय हेडा आदी उपस्थित होते.
शिवाप्पा चंदरगी यांच्या पथकाने पथनाटय़ सादर केले. बसवराज यलिगार यांनी स्वागत, सी.जी. अग्निहोत्री यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी मळेग्यन्नावर यांनी आभार मानले. प्रकाश माने, वसंत पाताली, कविता कुंभार आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.