सोमवारी फाटक खुले होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटनजीक दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने मंगळवार दि. 4 पासून रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. रविवारी पहिले रेल्वेगेटनजीकचे काम पूर्ण झाल्यानंतर पेव्हर्स बसविण्यात आले. परंतु घातलेले काँक्रीट सुकले नसल्याने सोमवारी रेल्वे फाटक सुरू होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. रेल्वे फाटक लवकरात लवकर खुले करावे व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
रेल्वेची गती वाढविण्यासाठी मुंबई-पुणे-मिरज-लोंढा-हुबळी-बेंगळूर-चेन्नई या मार्गाचे दुपरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. यातील काही टप्पे पूर्ण झाले असून उर्वरित टप्पे रेल्वे विभागाकडून पूर्ण केले जात आहेत. सध्या बेळगाव ते खानापूर या दरम्यानचे काम सुरू आहे. पहिले रेल्वेगेट परिसरात मागील सात दिवसांपासून काम सुरू ठेवण्यात आले होते. खडीकरण करून झाल्यानंतर त्यावर रेल्वे ट्रक घालण्यात आले. त्यानंतर पेव्हर्स बसवून काँक्रिटीकरण करण्यात आले.
काँग्रेस रोडवरील टिळकवाडीला जाण्यासाठी पहिले रेल्वेगेट हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाने शेकडो वाहने ये-जा करतात. रेल्वेगेट बंद असल्यामुळे दुसऱया रेल्वेगेट मार्गे वाहनचालकांची गैरसोय होत होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत रेल्वेगेटचे काम पूर्ण होण्याचा अंदाज होता. परंतु ते वेळेत पूर्ण झाले नाही. रविवारी दुपारपर्यंत काम पूर्ण झाले. परंतु घालण्यात आलेले काँक्रिट पूर्णपणे सुकले नसल्याने सोमवारी सकाळी रेल्वे गेट खुले होण्याची शक्मयता आहे.
घालण्यात आले 3 ट्रक
पहिल्या रेल्वेगेटनजीक जुना रेल्वे ट्रक बाजुला सरकविण्यात आला. त्या जागी दोन नवे ट्रक घालण्यात आले. दुपदरीकरणाचे दोन ट्रक असून एक अतिरिक्त सेवेसाठी ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी दोन्ही टॅक व्यस्त असतील त्यावेळी मालवाहक रेल्वे ये-जा करण्यासाठी हा तिसरा ट्रक घालण्यात आला आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.