अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 23 मार्च 2022, सकाळी 11.45
● संपूर्ण कोरोनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल
● गेल्या चोवीस तासांत केवळ एका रूग्णाची नोंद
● दहा तालुके निरंक
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात केवळ एक जण बाधित आढळून आला आहे. जिल्ह्यात 29 रुग्ण सक्रिय असून, मृत्यू झाला नाही. त्यामुळे संपूर्ण कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 24 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. त्याची द्वीवर्षपूर्ती आज झाली. त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
कोरोना लढ्याची दोन वर्षे
सातारा जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी सलग दोन वर्षे प्रशासन प्रयत्न करत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा दाहक अनुभव जिल्ह्याने घेतला. तिसरी लाट सौम्य होती. आता तर संपूर्ण कोरोना मुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
कराडमध्ये एका रूग्णाची नोंद
जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालात कराडमध्ये एका रूग्णाची नोंद झाली आहे. अन्य दहा तालुके निरंक आहेत. गेल्या चोवीस तासांत 410 चाचण्या झाल्या आहेत. बाधित वाढीचा दर 0.24 टक्के आहे.
बुधवारी
नमुने-410
बाधित-01
मृत्यू-00
बुधवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-25,67,953
बाधित-2,79,180
मृत्यू-6683
मुक्त-271760