श्री चषक निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा : रब्बानी, मतीन, रोहित, बजंत्री सामनावीरचे मानकरी
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स, नरवीर वडगाव, मराठा स्पोर्ट्स ग्रामीण, पांडुरंग सीसी चिकोडी संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. रब्बानी दफेदार, मतीन मुल्ला, रोहित ढवळे, रामचंद्रा बजंत्री यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने 8 षटकात 3 बाद 142 धावा केल्या. त्यात अभिषेक देसाईने 6 षटकार 1 चौकारासह केवळ 10 चेंडूत 45, रब्बानी दफेदारने 5 षटकारासह 9 चेंडूत 34 धावा केल्या.
अलरजातर्फे मनिषने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल अलरजा संघाने 8 षटकात 9 बाद 52 धावाच केल्या. त्यात सद्दामने 21 धावा केल्या. साईराजतर्फे रब्बानी दफेदारने 11 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात नरवीर वडगावने 8 षटकात 5 बाद 81 धावा केल्या. त्यात मुशाईदने 35 तर विक्रमने 26 धावा केल्या. आरोहितर्फे अश्विनने 16 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल आरोहि स्पोर्ट्सचा डाव 6 षटकात सर्व बाद 50 धावात आटोपला. त्यात अश्विनने 16 धावा केल्या. नरवीरतर्फे मतीन मुल्लाने 8 धावात 4 तर बिपीनने 18 धावात 4 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात युनायटेड युथने 7.1 षटकात सर्व बाद 35 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे रोहित ढवळेने 4 धावात 3 तर आकाश कटांबळेने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने 3.2 षटकात बिनबाद 36 धावा करून सामना 10 गडय़ानी जिंकला. त्यात संतोषने 21 धावा केल्या.
चिकोडी संघाचा एकतर्फी विजय
चौथ्या सामन्यात पांडुरंग सीसी चिकोडी संघाने 8 षटकात 5 बाद 86 धावा केल्या. त्यात रामचंद्राने 27 तर पवनने 16 धावा केल्या. एसजी स्पोर्ट्सतर्फे नामदेवने 26 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एस. जी. स्पोर्ट्सने 8 षटकात 9 बाद 55 धावाच केल्या. चिकोडीतर्फे रामचंद्राने 29 धावात 3, मौलालीने 5 धावात चार गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उदय होनगेकर, निरंजन बस्तवाडकर, शिवलिंग बेळगावकर, प्रताप जाधव, योगेश कलघटगी, विजय जाधव, धिरज झवेरी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बुधवारी उपांत्य फेरीचे सामने – 1) साईराज वॉरियर्स वि. मराठा स्पोर्ट्स ग्रामीण सकाळी 10 वा. 2) नरवीर वडगाव वि. पांडुरंग सीसी दुपारी 12 वा.