सेंच्युरियन : पाक क्रिकेट संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तिसऱया निर्णायक सामन्यात फख्र झमानच्या शानदार शतकामुळे तसेच ‘सामनावीर’ कर्णधार बाबर आझमच्या समयोचित खेळीच्या जोरावर पाकने दक्षिण आफ्रिकेचे 28 धावांनी पराभव केला. झमानने 101 धावा झळकविल्या. कर्णधार बाबर आझमचे शतक 6 धावांनी हुकले.
पाकने 50 षटकांत 7 बाद 320 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 49.3 षटकांत 292 धावा आटोपला. आता उभय संघामध्ये चार सामन्यांच्या टी-20 मालिकेला शनिवारपासून जोहान्सबर्ग येथे प्रारंभ होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाक 50 षटकांत 7-320 (फख्र झमान 101, बाबर आझम 94, केशव महाराज 3-45), द. आफ्रिका- 49.3 षटकांत सर्वबाद 292 (मलान 70, व्हेरेनी 62, शाहीन आफ्रिदी 3-58, नवाज 3-34, रॉफ 2-45).