ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानातील पीटीव्ही न्यूज चॅनेलने वृत्तांकन करताना नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे दाखवल्याने दोन पत्रकारांना नोकरी गमावण्याची वेळ आली.
पाकिस्तान सरकारच्या मालकीचे पीटीव्ही हे न्यूज चॅनेल आहे. 6 जून रोजी या चॅनलने कोरोना विषाणूसाठी बनविलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून पीओकेचा एक नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशात पाकव्याप्त काश्मीर भारताच्या हद्दीत दाखवण्यात आला होता. त्याचा भारत आधीच दावा करत आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पाकचे पंतप्रधान इम्रान खान सर्व स्तरातून ट्रोल झाले होते.
या वृत्तानंतर पीटीव्हीने निवेदन दिले होते की, मानवी चुकांमुळे पाकिस्तानचा नकाशा चुकीचा दाखविण्यात आला. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यानंतर 8 जूनला पाकिस्तानी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित दोन पत्रकारांवर कारवाई करण्यात आली.