ऑनलाईन टीम / पेशावर :
पाकिस्तानातील झियारत डोंगररांगांमधील संगमरवराची खाण कोसळून 19 जण ठार झाले. तर अजूनही ढिगाऱ्याखाली 12 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तेथील जिल्हा पोलीस अधिकारी मोहमंद तारिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पेशावरपासून 85 किलोमीटरवर असलेल्या झियारत डोंगररांगांमधील संगमरवराची खाण प्रसिद्ध आहे. सोमवारी रात्री तेथील डोंगराचा मोठा भाग खचला आणि तो भूभाग खाणीत कोसळला. या दुर्घटनेत 12 खाणकामगार जागीच ठार झाले. तर 7 जणांचा जिल्हा मोहम्मद रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये खैबर पख्तुनवा साफी गावातील टेकडीवरच्या काही पर्यटकांचाही समावेश आहे.
दुर्घटना घडली त्यावेळी खाणीत 45 कामगार काम करत होते. त्यामधील 19 जण ठार झाले. 9 जणांना वाचवण्यात यश आले. काही जण जखमी झाले आहेत तर काही मातीच्या ढिगाऱ्यात गाढले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.