अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.30
● जिल्ह्यात सर्वच तालुके कोरोनामुक्तीकडे
● 24 तासात 15 नवे रूग्ण वाढले
● 1019 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेट 1.37 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट नाहीसे होत आहे. आता जिल्हा प्रशासनाकडून केवळ सोपस्कार म्हणून दैनंदिन आकडेवारी जाहीर केली जात आहे. वास्तवात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनामुक्तीचे संकेत मिळत असून सातारा, कराड वगळता इतर सर्वच तालुक्यात अपवादात्मक एक किंवा दोन रूग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1019 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 15 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 1.37 वर घसरला आहे.
अपवादात्मक रूग्णवाढ
जिल्ह्यातील सातारा, कराडसह सर्वच तालुके कोरोनाच्या लाटेतून पुर्णतः सावरले आहेत.जावली, पाटणसह काही तालुक्यात नवा एकही रूग्ण दोन दिवसात आढळलेला नाही. उर्वरीत तालुक्यात एक किंवा दोन रूग्ण आढळत आहेत. सातारा, कराड तालुक्यात पाचपेक्षा कमी रूग्णवाढीची नोंद होत आहे. जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाल्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागानाही सुटकेचा निःश्वास सोडला असून लसीकरणावर जोर दिला आहे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यावर प्रत्येक तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत.
एक अंकी वाढीने दिलासा
शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात जावली तालुक्यात 1, कराड तालुक्यात 4, खंडाळा तालुक्यात 1, खटाव तालुक्यात 1, कोरेगाव तालुक्यात 1, माण तालुक्यात 1, सातारा तालुक्यात 4, वाई तालुक्यात 2 असे 15 नवे रूग्ण वाढले आहेत.
शुक्रवारी
नमुने-1019
बाधित-15
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,46, 431
बाधित-2,78,936
मृत्यू-6670
मुक्त-2,71,197