आज सगळं जग ऑनलाईन व्यवहारांमुळे एकत्र आलं आहे. मग शॉपिंगचं जग वेगळं कसं राहील? ऑनलाईन शॉपिंग ही सध्याची मोठी क्रेझ आहे. ऑनलाईन साईटवर अनेक वस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फूटवेअर. वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवर विविध प्रकारचे फूटवेअर पहायला मिळतात. पण चप्पल खरेदी सोपी नसते. काही वस्तू दुकानातून खरेदी करणं चांगलं असतं. चप्पल ही सुद्धा अशाच काही वस्तूंपैकी एक… चप्पल मापाची असायला हवी. तसंच चालताना आरामदायी वाटायला हवं. चप्पल योग्या मापाची नसेल तर तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो रोजच्या वापरातली चप्पल आरामदायीच हवी. मात्र ऑनलाईन खरेदी स्वस्त पडते म्हणून किंवा एखाद्या साईटवरची चप्पल खूपच आवडली म्हणून खरेदी केली जाते. तुम्हीही पादत्राणांची ऑनलाईन खरेदी करत असाल तर काही मुद्दे लक्षात असू द्या.
- फूटवेअर ऑनलाईन खरेदी करत असाल तर योग्य मापाचे असतील याची खात्री करून घ्या. प्रत्येक फूटवेअरची साईज ब्रँडनुसार वेगळी असते.
- रिटर्न आणि एक्सचेंज ऑफरच्या अटी नीट पाहून घ्या. नंतर ती बदलताना कोणतीही अडचण येणार नाही.
- फूटवेअरची डिलीव्हरी मिळाल्यानंतर लगेच घालून बघा; जेणेकरून एका सिमित वेळेपर्यंत तुम्ही ते परत करू शकाल.
- फूटवेअर घेण्याआधी संबधित विविध तपशील तपासून पहा. त्याची उंची, लेदर, डिझाईन या बाबींबद्दल शंका असल्यास संबंधित बंडच्या ग्राहक प्रतिनिधींशी बोलून घ्या.
- ऑनलाईन फूटवेअर घेताना फॅशनकडे लक्ष देण्याऐवजी आरामदायी चप्पलची निवड करा.
- चप्पलचे परिक्षण स्वच्छ पृष्ठभागावर करा, जेणेकरून ते परत करताना काहीच अडचण येणार नाही.
बरेचदा पादत्राणांचे प्रत्यक्षातले रंग वेगळे असतात. त्यामुळे फार चिकित्सा करू नका.