प्रतिनिधी /मडगाव
पायराबांद-कुंकळळी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव फाल्गुन शु. अष्टमी गुरूवार दि. 10 ते एकादशी रविवार दि. 13 मार्च पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे.
दि. 10 रोजी सकाळी महाभिषेक गणपतीपूजन, पुण्यहवाचन गणपत्यर्थवशिर्ष जप, गणसुक्त ब्रम्हणस्पती सुक्तपारायण, प्रकारशुद्धी महामंगळारती प्रार्थना व दुपारी 1.30 वा. महाप्रसाद सायंकाळी 7 वा. भजन व ठिक 9 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक रात्री 10 वा. श्री सिद्धीविनायक मंदिर संस्थान पायरांबांध हय़ांच्या जोड पावलांनी श्री सिद्धीविनायक सांस्कृतिक कला मंडळ प्रस्तुत दोन अंकी धमाल कोकणी विनोदी नाटक ‘कुड्डो मोग’ सादर करण्यात येईल.
शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी श्रीस महाभिषेक अथर्वशिर्ष हवन, पूर्णाहुती, महामंगळारती, प्रार्थना व दुपारी 1.30 वा. महाप्रसाद संध्याकाळी 7 वा. भजन व रात्री 9 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक रात्री 10 वा. कोकणी नाटक ‘भविष्याचो रोग-जाणटेपणात मोग’ सादर करण्यात येईल.
शनिवार दि. 12 रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, श्री नागेश्वर प्रित्यर्थ रूद्रहोम, मारूती प्रित्यर्थ पवमानहोम, पूर्णाहूति, महामंगळारती प्रार्थना व दुपारी 1.30 वा. महाप्रसाद. संध्याकाळी 7 वा. भजन व 9 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, रात्री 10 वा. कोकणी विनोदी नाटक ‘गोयकारांनो जायात जागे’ सादर करण्यात येईल.
रविवार दि. 13 रोजी सकाळी महाभिषेक, सत्वविनायकवृत्त महापूजन, महामंगळारती, प्रार्थना व दुपारी 1.30 वा. अन्नसंतर्पण संध्याकाळी 7 वा. भजन ठिक 9 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक नंतर 10 वा. जुनी, नवीन हिट गाणी सादर करणार गोव्यातील एकमेव ऑर्केस्ट्रा ‘गोवन मेलोडीस’ सादर केला जाणार आहे.
या जत्रोत्सवाला सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष नाईक, चिटणीस शिवदास नाईक, खजिनदार सुरेश नाईक व मुखत्यार विदेश नाईक यांनी केले आहे.