प्रतिनिधी / विटा
विट्यात राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत आवाज उठवताच मुख्याधिकारी अतुल पाटील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शुक्रवारी सकाळी नगरपालिका पथकासह महामार्गावरील व्यापारी संकुल येथे बेशिस्त वाहनांवर कारवाईचा इशारा देत पार्किंगला शिस्त लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी आरोग्य विभागाचे आनंदा सावंत, नारायण शितोळे, राजेंद्र चिरमे, प्रकाश गायकवाड यांच्यासह विभागप्रमुख, वाहतूक पोलीस उपस्थित होते.