प्रतिनिधी/ बेळगाव
बेननस्मिथ मेथोडिस्ट पदवी महाविद्यालयातील प्राध्यापक पार्वतीदेवी बाबागौडा पाटील यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाने पीएचडी पदवी दिली आहे. बागलकोट सरकारी महाविद्यालयाच्या डॉ. शशिकला मुरीबाशेट्टी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पार्वतीदेवी यांनी बेळगाव जिल्हय़ातील नवोदय काव्य या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला आहे.