प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत 14, 15 व 16 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या दौऱयावर येत आहेत.
शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी रात्री सोईनुसार पोलीस मुख्यालय, शासकीय
विश्रामगृह, ओरोस – सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम. शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंडवर स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग येथून मोटारीने विजयदुर्ग किल्ल्याकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या उपस्थितीत विजयदुर्ग किल्ल्यास भेट व पाहणी, दुपारी 1.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता विरवाडी-देवगड येथे सुधीर जोशी यांची सदिच्छा भेट. दुपारी 3.45 वा. कुणकेश्वर-देवगड येथे दिवंगत किशोर पेडणेकर यांच्या कुटुंबियांची निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी 4.15 वा. पत्तन अधिकारी, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यासमवेत तांबळडेग समुद्र किनारपट्टी पाहणी, दुपारी 4.45 वा. दहिबाव-देवगड येथे ओगले फूड प्रोसेस संस्थेस भेट. सायंकाळी 6 वा. तहसील कार्यालय, कणकवली येथे उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या समवेत देवघर पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत कॅनॉलबाबत आढावा बैठक, सायं. 7 कणकवली येथून मोटारीने, ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, रात्री 8 वाजता पोलीस मुख्यालय, शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम.
रविवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आशा स्वयंसेविका सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, 11.15 वा. भिरवंडे सहकार भवन, भिरवंडे, ता. कणकवली येथे भरवंडे वि.का.सह. सेवा सोसायटी, भिरवंडे अमृत महोत्सवी वर्ष व संस्था कार्यालय उद्घाटन समारंभास उपस्थिती, दुपारी 2.30 वा. शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हय़ातील 10 वी व 12 वी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेले विद्यार्थी तसेच 100 टक्के निकाल लागलेल्या शाळा, संस्थांच्या गुणगौरव कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी सोईनुसार ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.