प्रतिनिधी/ सातारा
पालिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा या मागणीसाठी म्युनसिपल कामगार युनियनच्यावतीने करण्यात आलेल्या संप बुधवारी मागे घेण्यात आला. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी शिष्टाई केल्यामुळे सर्व मागण्या मान्य झाल्याने बुधवारी पालिकेचे कामकाज नियमितपणे सुरु झाले. युनियनच्या पदाधिकाऱयांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयावर कारवाई होणार नाही, अशी ग्वाहीही मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी फोनवरुन दिली. गेल्या दोन दिवसांपासून पालिका कर्मचारी युनियनने पालिका कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगातील फरक मिळावा या मागणासाठी संप करण्यात आला होता. पालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासोबत चर्चा शिष्टमंडळाची झाली होती. ती बैठक निष्फळ ठरली होती. मंगळवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष ऍड. डी. व्ही. पाटील यांनी कामगारांच्या मागण्याबाबत आंदोलनाकरीता मार्गदर्शन केले. त्यानुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कामगार युनियनच्या मागण्या मान्य केल्याने बुधवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी स्पष्टपणे ग्वाही दिली. तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांना नोटीस बजावण्यात आल्याचा मुद्या मांडताच त्यासही त्यांनी कारवाई करण्यात येणार नसल्याची ग्वाही दिली. त्यानुसार नगराध्यक्षा माधवी कदम, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी व युनियनचे श्रीरंग घाडगे यांनी पालिका कर्मचाऱयांच्यासमोर झालेली चर्चा मांडली. त्यावेळी श्रीरंग घाडगे यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.