प्रतिनिधी/ सातारा
Rयेथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सेवेसाठी मंगळवारी आणखी दोन ट्रक्टर दाखल झाले. 10 लाख रूपयांचे दोन ट्रक्टर आरोग्य विभागाकडे दाखल झाल्याने आरोग्य विभागाकडील ट्रक्टरची संख्या चार झाली आहे.
या ट्रक्टरचा शहरवासियांना सेवा देण्यासाठी बहुउद्देशीय पद्दतीने वापर करण्यात आहे. आरोग्य विभागाच्या कामासही गती मिळणार आहे. मंगळवारी दुपारी हे ट्रक्टर दाखल झाले, त्यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्याची ट्रायल घेतली. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर उपस्थित होते. आरोग्य विभागाचे निरीक्षक मिलिंद शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.