नवी दिल्ली : औषध क्षेत्रात कार्यरत असणाऱया आघाडीवरच्या पिरामल फार्मा या कंपनीने आपला 20 टक्के इतका हिस्सा कार्लाइल ग्रुपला नुकताच विकला आहे. या हिस्सा विक्रीतून पिरामलला 3 हजार 523.40 कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय फार्मा उद्योगातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्री करार असल्याचे बोलले जात आहे. या हिस्सा विक्रीच्या माध्यमातून कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी येणाऱया काळात प्रयत्न करणार आहे. कार्लाइल ग्रुप ही अमेरिकेतील कंपनी असून गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे.
Previous Articleकिंग्स इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबादचा मुकाबला आज
Next Article ‘थार’ वाहनाला उत्तम प्रतिसाद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.