धर्मात निषिद्ध असणाऱया व्यवसायात सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) भारतविरोधी कारवाया आणि विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याचे गंभीर आरोप होत राहिले आहेत. सीएएविरोधी निदर्शनांकरता चिथावणी, सरकारविरोधात आक्षेपार्ह लढा, सिमीशी कनेक्शन, विदेशातून अवैध स्वरुपात रक्कम जमविण्यासह अनेक गैरकृत्यांप्रकण्री ही संघटना सरकारी यंत्रणांयच रडारवर राहिली आहे. या संघटनेवर अलिकडेच ईडीने कारवाई केली असून यादरम्यान महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
मागास आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारात आवाज उचलण्याचा दावा करणाऱया पीएफआयचे मूळ केरळच्या कालीकतमध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ईडीच्या छाप्यादरम्यान पीएफआयचा मुस्लीम संघटना असण्याचा मुखवटाही उतरला आहे. पीएफआयचे पदाधिकारी धर्मात निषिद्ध मानल्या जाणाऱया मद्यविक्रीचा (बार) व्यवसाय करत आहेत. केंदीय यंत्रणेला पीएफआय पदाधिकाऱयांचे अबुधाबीमध्ये रेस्टॉरंट आणि बार असल्याचे काही दस्तऐवज मिळाले आहेत.
केरळमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने पीएफआय पदाधिकाऱयांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. 8 डिसेंबर रोजी पीएफआयचा सदस्य शफीक पेयथच्या घरी, पीएफआयच्या पेरमपादप्पूचा विभागीय अध्यक्ष अब्दुल रजाक, एर्नाकुलमच्या मुवाट्टुपुझामध्ये पीएफआय पदाधिकारी एमके अशर्रफ उर्फ तमर अशरफच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते.
पीएफआयने छाप्याच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सीआरपीएफच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईदरम्यान गुन्हय़ांमधील सहभागाचे संकेत देणारे दस्तऐवज, डिजिटल उपकरणे, विदेशातून रक्कम प्राप्त केल्याचे आणि विदेशात मालमत्ता बाळगल्याचे पुरावे सापडले आहेत.
मुन्नार व्हिला विस्टा प्रकल्पासह केरळमधील विविध प्रकल्पांद्वारे पीएफआय मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील आहे. पीएफआय पदाधिकाऱयांकडून अबुधाबीमध्ये बार आणि रेस्टॉरंटसह विदेशात मालमत्ता जमविल्याची बाब निदर्शनास आली असून याची चौकशी केली जात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ईडीकडून ही कारवाई आमचा छळ करण्यासाठी होतेय आणि संघटना कायदेशीर आणि लोकशाहीच्या मार्गाने याच्या विरोधात लढणार असल्याचा दावा पीएफआयच्या महासचिवाने केला आहे.
सिमीशी कनेक्शन
केरळमध्ये उदयास आलेली ही वादग्रस्त संघटना आता दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, आसाम समवेत 20 हून अधिक राज्यांमध्ये पोहोचली आहे. 2006 मध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) नंतर याचा उदय झाल्याने याला सिमीची बी-टीम देखील म्हटले जाते. 2012 पासून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी वारंवार केली जातेय. केरळमध्ये या संघटनेच्या सदस्यांकडून शस्त्रास्त्रs, बॉम्बशी निगडित दस्तऐवज मिळाले होते.
गंभीर आरोप
या संघटनेच्या सदस्यांवर लव्ह जिहाद, शांतता भंग करणे, सरकारविरोधात निदर्शनांना चिथावणी देणे आणि दंगल घडविण्याचे आरोपही झाले आहेत. क्ही संघटना देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केरळ आणि उत्तरप्रदेश सरकारने न्यायालयात सांगितले आहे. कट्टरवादाला खतपाणी घालण्याचा आरोप पीएफआयवर होतो.