ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जल जीवन मिशनचे मोबाईल ॲप आणि राष्ट्रीय जल जीवन कोश लाँच करणार आहेत. ते ग्रामपंचायत आणि पाणी समित्यांशीही संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटनुसार, आज सकाळी 11 वाजता ते जलशक्ती आणि ग्रामविकासच्या कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ग्रामपंचायती आणि जल समित्यांशी संवाद साधून त्यांना जल जीवन मिशनचे फायदे समजावून सांगतील. तसेच जल जीवन मिशन मोबाईल ॲप आणि राष्ट्रीय जल जीवन कोश लाँच करतील.
या योजनेत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल आणि राष्ट्रीय जलजीवन निधीअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांवर नळ बसविण्यात येतील. कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी आणि स्वयंसेवी संस्था या निधीला देणगी देऊ शकतात.