ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘e-RUPI’ या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे लॉन्चिंग करणार आहेत.
राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहकार्याने आपल्या यूपीआय व्यासपीठावर ‘e-RUPI’ विकसित केले आहे. डिजिटल पेमेंटसाठी हे पूर्णपणे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे.
‘e-RUPI’ हा क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे. जो लाभार्थीच्या मोबाईलमध्ये वितरित केला जातो. सेवा प्रदात्यांकडे कार्ड, डिजिटल पेमेंट ॲप किंवा इंटरनेट बँकिंग नसतानाही व्हाउचर रिडीम करता येईल.