केरळमध्ये पक्षाला मोठा धक्का- हायकमांडकडे पाठवला राजीनामा
तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमध्ये सुरू असलेल्या विधानसभा उमेदवार निवडीच्या वादातून काँग्रेसचे ज्ये÷s नेते आणि माजी खासदार पीसी चाको यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. चाको यांनी पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. त्यांच्या नाराजीने पुढील महिन्यात 6 एप्रिलला होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पीसी चाको यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. पक्षात गटबाजी माजली असून, काम करणे अवघड झाले आहे, असे सांगत चाको यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. मागील अनेक दिवसांपासून माझ्या मनात पक्ष सोडण्याचा विचार होता असे सांगत ‘गटबाजी हा केरळ काँग्रेसला लागलेला मोठा शाप आहे. केरळमध्ये काँग्रेसमध्ये एकजूट नसून एक काँग्रेस (आय) आणि काँग्रेस (ए) असे दोन गट बनले आहेत. या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे,’ अशी टीका चाको यांनी केली आहे. ही टीका करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी आणि विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांची नावेही उघड केली. लोकांना काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणायचे आहे, पण गटबाजी या मार्गात मोठा अडथळा बनला आहे. केरळ काँग्रेसमध्ये असलेली गटबाजीकडे आपण दिल्लीतील नेतृत्त्वाचे लक्ष वेधले होते, पण पक्षश्रे÷ाrंनी गटबाजी थांबवण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे आता काँग्रेससाठी काम करणे अवघड होत चालल्याने आपण पक्षाला ‘रामराम’ ठोकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय कारकीर्द
पीसी चाको चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून चारवेळा खासदार राहिलेले आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. 1968 मध्ये त्यांची केरळ विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर 1970 मध्ये त्यांची केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 1980 मध्ये ते केरळ विधानसभेत पोहोचले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असल्याने ते हायकमांड सोनिया गांधी यांच्या निकटतर्वीयांमध्येही त्यांचा समावेश होता. इतर राज्यांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले होते.