प्रतिनिधी/कराड :
आधुनिक कराडचे शिल्पकार स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 12 व्या पुण्यतिथीदिनी येथील समाधीस्थळी तसेच सहय़ाद्रि सहकारी साखर कारखान्यावर अभिवादन करण्यात आले. राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून प्राथमिक स्वरूपात पाटील कुटुंबीय व आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब स्मारक समितीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव पाटील, ज्योतिर्लिंग विकास सोसायटीचे संस्थापक अरुण पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे चेअरमन जयंत पाटील, सागर पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, दिग्विजय पाटील, कराड उत्तरचे युवा नेते, सह्याद्रि कारखान्याचे संचालक जशराज पाटील, पार्थेश पाटील, स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, माजी उपनगराध्यक्ष संभाजीराव सुर्वे, माजी नगरसेवक मानसिंगराव पाटील, दिलीप चव्हाण, जगन्नाथ माने, ए. एन. मुल्ला, प्राध्यापक रामभाऊ कणसे यांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली.
सहय़ाद्रि कारखान्यावर अभिवादन
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 12 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त यशवंतनगर (ता. कराड) येथे कारखाना कार्यस्थळावरील पूर्णाकृती पुतळ्यास सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करून पुष्पांजली अर्पण केली व विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी आदरणीय
साहेबांच्या जीवन कार्याची माहिती विषद केली. कराड परिसरासह सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीवेळी दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
फायनान्सियल ऍडव्हायझर एच. टी. देसाई, जनरल मॅनेजर पी. आर. यादव,
चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, चीफ अकौन्टंट जी. व्ही. पिसाळ, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, पर्यावरण इंजिनिअर एच. जे. माने, डिस्टीलरी इनचार्ज डी. जे. जाधव, इरिगेशन संपर्क प्रमुख आर. जी. तांबे, सुरक्षा अधिकारी एस. बी. नाईगडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.