प्रतिनिधी /फोंडा
पुंडई औद्योगिक वसाहत परिसरात अवैधरित्या दारूविक्री करणाऱया एका रेस्टारॅन्टात सुमारे 45 हजार रूपये किमतीचा अडीचशे लिटर मद्यसाठा फोंडा पोलिसांनी जत्प केला आहे. याप्रकरणी मयुर रेस्टॉरेन्टच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. फोंडा पोलिसांनी सापळा रचत मुद्देमालासह संशयिताला अटक केली. यात मोठय़ा प्रमाणात रम, वोडका, विस्की, ब्रेन्डी, बियर साठा जप्त केला आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विभीनव शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, महेश गावडे यांनी ही कारवाई केली.