नवी दिल्ली
फोल्डेबल स्मार्टफोन्स हे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून 2021 मध्ये विक्रीत यांचा नंबर वरचा असणार असल्याचे या क्षेत्राती जाणकार सांगत आहेत. जाणकारांच्या मते 2022 मध्ये 3 लाख फोल्डेबल स्मार्टफोन्सची विक्रमी विक्री होऊ शकते.
2021 मध्ये या फोन्सची विक्री ही 638 टक्के अधिक राहणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. पुढील वर्षात कंपनीच्या वार्षिक महसुलातही भरमसाठ वाढीची शक्यता सांगितली जात आहे. सुमारे 3 हजार 200 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सॅमसंगसह इतर स्पर्धक कंपन्या पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये आपले नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स बाजारात दाखल करणार असून ग्राहकांचे लक्ष या फोन्सवर राहिलेले आहे. सॅमसंग ही एकमेव कंपनी आहे जिचे फोल्डेबल स्मार्टफोन्स बाजारपेठे 3 वर्षापासून उपलब्ध आहेत. या फोल्डेबल स्मार्टफोन्स विक्रीतून सॅमसंगला 2021 कॅलेंडर वर्षात भरभक्कम महसूल प्राप्त करता येणार आहे.