ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरात सध्या मेट्रोचे काम सुरू मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. कोथरूडमध्ये असलेल्या मेट्रो कारशेडमध्ये काम करणाऱया एका कर्मचाऱयाला गोळी लागल्याची घटना घडली आहे. अनजय कुमार (वय 24, रा.बिहार), असे जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथे ज्या ठिकाणी मेट्रो शेड आहे. तेथून काही अंतरावर लष्करातील जवानांच प्रशिक्षण सुरू होते. तर मेट्रो कारशेडमध्ये कर्मचाऱयांचे काम सुरू असताना, अचानक पत्र्याच्या शेडवर मोठय़ने आवाज आला. त्याच दरम्यान एक गोळी अनजय कुमार या तरुणाला लागल्याची घटना घडली. या प्रकरणी जखमी कामगाराला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे कोथरूड पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी चार बुलेट सापडल्या आहेत. ह्या बुलेट रायफलच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत लष्कराने अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.