वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे बेंगलोर महामार्गावर मोटर सायकलला पाठीमागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसून तरुण जागीच ठार. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास समीर शिवाजी शिंदे( वय 27 ) रा. जाधव कॉलनी उजळाईवाडी (ता. करवीर )हा तरुण गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता.
तो आज सकाळी कामावर जात असताना गोकुळ शिरगाव जवळ येथील पंचशील कमानी समोर वेगाने आलेल्या ट्रकची समीरच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक बसून तो ट्रकच्या चाकाखाली आला त्याच्या डोक्यावरून चाक केल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून चालक गजानन आनंद वारके ( वय 52) रा.यमगे (ता. कागल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव करीत आहेत.