बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पुलावरून सरळ खाली कोसळल्याची घटना एम के हुबळीनजीक घडला. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालक मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक चिक्कमंगळूरवरून महाराष्ट्रामध्ये लाकूड वाहतूक वाहतूक करत होता. दरम्यान मलप्रभा नदी नजीक एम के हुबळी येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक सरळ पुलावरून खाली कोसळला. यात ट्रकचा अक्षरशः चुरडा झाला. या अपघातातून ट्रक चालक रामदास गोडे हे मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. दरम्यान या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात झाली आहे.