ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 लाख 45 हजार 719 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 948 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 49 हजार 848 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 5 हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 72.5 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 47 हजार 392 रुग्णांपैकी 1 लाख 12 हजार 648 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 31 हजार 237 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.43 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 39 हजार 310 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 948 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.