ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 65 हजार 971 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 78 हजार 643 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 468 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.92 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 44 हजार 516 रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 559 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 42 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 80.39 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 266 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 93, सातारा जिल्ह्यात 790, सोलापूर जिल्ह्यात 660, सांगली जिल्ह्यात 1 हजार 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 713 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 99 हजार 234 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 65 हजार 971 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.