ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 5 लाख 70 हजार 104 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 92 हजार 436 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 6 हजार 253 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.23 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 86 हजार 417 रुग्णांपैकी 3 लाख 72 हजार 559 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 4 हजार 872 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 986 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.41 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 लाख 41 हजार 853 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 92 हजार 436 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.