ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 973 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 38 हजार 661 आहे. कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. तसेच 1 हजार 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले पुणे जिल्हयातील 84 हजार 765 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 54 हजार 128 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 28 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 122, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 983, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 78, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 306 रुग्णांचा समावेश आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 981 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 337, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 361, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 62, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 41, ग्रामीण क्षेत्रातील 149 रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे. उर्वरित 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.86 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 15 हजार 20 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 5 हजार 973 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.