ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 849 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 949 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 127 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
ते म्हणाले, कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 94, सोलापूर जिल्हयात 9, सातारा जिल्हयात 1 तर व कोल्हापूर जिल्हयात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 352 बाधीत रुग्ण असून 1 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
पुढे ते म्हणाले, आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 हजार 438 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 37 हजार 552 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 876 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 33 हजार 654 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 849 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.