ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 65 हजार 989 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 23 हजार 931 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 794 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 54 हजार 13 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 34 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 18 हजार 244 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 695, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 803 व पुणे कॅन्टोंन्मेंट 198, खडकी विभागातील 47, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 445, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 32 हजार 256 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 27 हजार 264 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 992 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 60 हजार 534 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.