सोलापूर / प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक समितीची स्थापना सोमवारी सरकारने स्थापन केले असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली 14 समिती सदस्य असणार आहेत. तसे परिपत्रकही शासनाकडून जारी झाले आहे.
सोलापूर विद्यापीठाचे नामांतर झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे म्हणून अशी मागणी करण्यात आली होती. विद्यापीठ सर्व राज्य सरकारने ती मागणी मान्य केली असून त्याचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे .त्यासाठी सरकारने स्मारक समितीची स्थापना केली आहे.
सध्या हिरज रोड वरील विद्यापीठाच्या जागेत मुख्य प्रशासकीय इमारतीचे व परीक्षा भवनाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे शासनाच्या देशातून स्पष्ट झाले आहे.
स्मारक समितीतील हे आहेत पदाधिकारी
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्त करण्यात आले असून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस कार्याध्यक्ष, आमदार रोहित पवार, उत्तम जानकर ,बाळासाहेब बंडगर पाटील, अशोक पाटील ,गेना दोलतोडे, डॉ. अनिकेत देशमुख,चेतन नरोटे, आदित्य फत्तेपुरकर, बाळासाहेब शेळके, श्रावण भवर,अस्मिता गायकवाड ,सारिका पिसे सुचिता वनकळसे, जगन्नाथ शिरसागर यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. कुलसचिव डॉक्टर विकास कदम यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.