ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात मागील 12 तासात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या आता 13 वर पोहचली आहे. ससून रुग्णालयात तिघांचा तर नायडू आणि नोबेल रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 167 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. 29 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.
पुण्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने पुण्यातील पेठांचा आणि अन्य काही भाग सील करण्यात आला आहे.