ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊची हवा रविवारी थोडी सुधारल्या नंतर पुन्हा एकदा खराब झाली आहे. सोमवारी 398 एक्युआय असल्याने लखनऊचा देशातील टॉप 10 सर्वात खराब प्रदूषण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश झाला आहे.
सीपीसीबीच्या रेकॉर्डनुसार, सोमवारी एक्युआय वाढण्या बरोबरच वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झालेली दिसून आली. तर तालकटोरा आणि लालबाग मधील हवा खूपच खराब झाली आहे. येथे एक्युआय क्रमशः 431 आणि 416 इतका होता. तर अलिंगजमध्ये 384, गोमतीनगरमध्ये 347 होता.
- डिसेंबर एक्युआय
- 6 366 खूप खराब
- 5 414 धोकादायक
- 4 414 धोकादायक
- 3 420 धोकादायक