प्रतिनिधी /बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील थर्मेकोल आर्टिस्ट आकाश हलगेकर याने समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्याला मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमेतून त्याने गरिबांना जेवण, अल्पोपाहार, फळे देण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने शेकडो लोकांना अन्नपदार्थांचे वाटप केले आहे.
आकाश हा युवा आर्टिस्ट असून त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती तसेच इतर सणांच्यावेळी तो नयनरम्य असे देखावे साकारत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याला बक्षिसे मिळाली आहेत. या बक्षिसांच्या रकमेतून तो गरिबांना साहित्याचे वाटप करीत आहे.