ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या काकपोरा भागात ही चकमक सुरू असून, सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना घेरले आहे.
दरम्यान, सर्व दहशतवादी स्थानिक असून, ते एका तीन मजली इमारतीत लपून बसले होते. सुरक्षा दलांनी स्फोटकांच्या माध्यमातून हे तीन मजली घर उडवून दिल्याची माहिती मिळत आहे.