ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गंगू भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला तात्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर गंगू परिसर सील करण्यात आला असून, जवानांकडून सर्च मोहीम सुरू आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 180 बीएन तुकडीवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.