पुलाची शिरोली / वार्ताहर
हातकणंगले तालूक्यातील पुलाची शिरोली येथील एका वृध्द महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. संबंधित महिलेसह पाच जणांचे कुटूंब पुणे येथून दहा जून रोजी आले होते. ते घरी आल्यावर तेथील नागरिकांनी प्रशासनाला बोलवून त्यांचे तात्काळ घोडावत काँलेज मध्ये इन्स्टिट्युशन कोरन्टाईल करण्यात आले होते.
घटनास्थळी इचलकरंजी प्रांताधिकारी विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी तत्काळ भेट देऊन माहिती घेतली. तसेच संबंधित विठ्ठल मंदिर परिसर कंटेंन्मेंट झोन लागू केला आहे. त्या कुटुंबातील लोकांच्या संपर्कात आलेल्या नऊ लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले आहे. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले व ग्राम विकास अधिकारी ए. एस. कठारे , तलाठी निलेश चौगुले , सरपंच शशिकांत खवरे आदी उपस्थित होते. दरम्यान परिसरातील सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी महिला ज्या कुटुंबातील सदस्य आहे ते घर व गल्ली सील करण्यात आली आहे. त्यानंतर वैद्यकीय व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन बफर झोनचा निर्णय घेतला जाणार आहे.