ऑनलाईन टीम / देहरादून :
तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुष्करसिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. पुष्कर सिंह धामी हे खटीमा विधानसभेच्या जागेवरून भाजपचे आमदार आहेत. 45 वर्षीय धामी हे उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
भाजप विधिमंडळ मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धामी यांचा शपथविधी रविवारी राजभवनात होणार आहे.